प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत ३४,८०० कोटींची मदत

नवी दिल्ली, दि. ६ मे २०२०: डिजिटल पेमेंटच्या सुविधांचा उपयोग करत, केंद्र सरकारने, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत ५ मे २०२० पर्यंत सुमारे ३९ कोटी गरजूंना ३४,८०० कोटी रुपयांची मदत केली आहे. कोविड-१९ मुळे लागू झालेल्या देशव्यापी लॉकडाऊनच्या काळात, गरिबांना मदत व्हावी या हेतूने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २५ मार्च रोजी या पैकेजची घोषणा केली होती.

प्रधानमंत्री गरीब कल्याण  योजनेचा भाग म्हणून सरकारने महिला, गरीब लोक, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांना अन्नधान्य आणि रोख रक्कम देण्याची घोषणा केली. या पैकेजच्या त्वरित अंमलबजावणीकडे केंद्र आणि राज्य सरकारचे सातत्याने लक्ष आहे. वित्त मंत्रालय, इतर संबंधित मंत्रालये, कॅबिनेट सचिव आणि पंतप्रधान कार्यालय एकत्रितपणे, या पैकेजचे लाभ गरजू लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

लाभार्थ्यांपर्यंत रोख मदत त्वरित पोहचावी यासाठी फिनटेक आणि डिजिटल तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. थेट लाभ हस्तांतरण सुविधेमुळे, मदतीची पूर्ण रक्कम, कोणत्याही मध्यस्थ अथवा गळतीविना थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत आहे. त्यासाठी लाभार्थ्यांना स्वतः बँकेत जाण्याची गरज नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा