पुणे, २२ ऑगस्ट २०२०: पुणे जिल्ह्यात सततच्या पडत असलेल्या पावसामुळे बंडगार्डन व दौंड येथून प्रचंड मोठ्या प्रमाणात विसर्ग शुक्रवारी व शनिवारी उजनीत आल्यामुळे उजनी धरण ७४ टक्के भरले आहे. आता उजनी भरणार आहे, यामुळे जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे. पुणे जिल्ह्यातील खडकवासला, कळमोडी, नाजरे, आंध्रा, डिंभे, घोड, पानशेत हि धरणे १०० टक्के भरले असून इतरही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत.
एकूण १९ धरणांपैकी जवळपास दहा धरणाची टक्केवारी नव्वद टक्केच्या पुढे झाली असून ज्यादा झालेले पाणी उजनीत सोडण्यात येत आहे. २० ऑगस्टला एकूण पाण्याचा साठा उजनीचा ९७.६७ टीएमसी होता, तो २२ ऑगस्टला एकूण पाण्याचा साठा १०३.४७ टीएमसी झाला. दोनच दिवसात सुमारे सहा टीएमसी पाणीसाठा उजनीत जमा झाला आहे.
धरण ८०% च्या पुढे गेल्यानंतर भिमानगरकर येथील १२ मँगावँट वीजनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित केला जातो. यासाठी १६०० क्यूसेक पाण्याची गरज लागते. हेच पाणी परत धरणात रिव्हर्सल केले जाते.
उजनीची सद्यस्थिती
एकूण पाणी पातळी ४९५.५८० मीटर
एकूण पाणी साठा २९२२.१८ दलघमी
(१०३.१८ टीएमसी)
उपयुक्त पाणी साठा १११९.३७ दलघमी
(३९.५३ टीएमसी)
टक्केवारी ७४%
उजनीत येणारा विसर्ग
दौंडमधून ३५४६३ क्यूसेक
बंडगार्डन १८९७० क्यूसेक
न्युज अनकट प्रतिनिधी : प्रदीप पाटील