राज्यात ‘ई-बाईक टॅक्सी’ धावणार! स्वस्त आणि वेगवान प्रवासाचा नवा पर्याय

राज्य सरकारने इलेक्ट्रिक बाईक टॅक्सींना मंजुरी दिल्याने आता शहरी प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार आहे. १.५ किमीसाठी केवळ १५ रुपये आणि त्यानंतर प्रत्येक किमीसाठी १०.२७ रुपये इतक्या परवडणाऱ्या दरात ही सेवा उपलब्ध होणार आहे. यामुळे रिक्षा-टॅक्सीच्या तुलनेत कमी खर्चात प्रवास करणे शक्य होईल.

केवळ इलेक्ट्रिक बाईक्सनाच परवानगी असल्यामुळे प्रदूषण आणि वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. तसेच, यातून स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी जीपीएस ट्रॅकिंग, हेल्मेट आणि महिलांसाठी चालक-प्रवासी पार्टिशन यांसारखे नियम अनिवार्य आहेत. यामुळे प्रवास सुरक्षित होईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे