अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर व स्वारगेट पोलीस स्टेशनच्या संयुक्त कारवाईत गुलटेकडी परिसरातील वसुंधरा आयुर्वेदिक मसाज सेंटर वर छापा टाकण्यात आला. आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या आडाख्याखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायातून पोलिसांनी तब्बल सहा पिडीत मुलींची सुटका केली.
पोलिसांनी मसाज सेंटरची मॅनेजर वैशाली रंगनाथ विस्पुते (वय ३१, रा. टिळेकरनगर, कोंढवा) हिला अटक केली असून तिच्यावर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्याविरुद्ध भा.न्या.सं. कलम १४३ तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
या छाप्यात सहा महिलांची सुटका करण्यात आली असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम (स्वारगेट पोलीस स्टेशन) करीत आहेत.
ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख व मा. पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे यांच्या आदेशाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक आशालता खापरे, मसापोफौ छाया जाधव, सपोफौ अजय राणे, पोलीस अंमलदार तुषार भिवरकर, इम्रानखान नदाफ, अमेय रसाळ, किशोर भुजबळ तसेच स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम व त्यांच्या पथकाचा सहभाग होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी दिनेश वढणे










































_VZxB5GROCJ.jpeg?updatedAt=1690955977838)
