देशात ३६०४ तर राज्यात १२३० नवीन कोरोना प्रकरणे

मुंबई, दि. १२ मे २०२०: कोरोनाचा आकडा हा रोजच वाढताना दिसत आहे. आजची आकडेवारी सरकारने जारी केली आहे. दि. १२ मे म्हणजेच आज सकाळ १० पर्यंतची माहिती अशी, पूर्ण भारतात आत्ता पर्यंत ७०,७५६ प्रकरणे आढळून आली आहेत. यामध्ये गेल्या २४ तासात ३,६०४ नवीन प्रकरणे वाढली आहेत. भारतात आत्तापर्यंत २,२९३ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे त्यात गेल्या २४ तासात ८७ नवीन मृत्यू समोर आले आहेत.

महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर आत्ता पर्यंत २३,४०१ प्रकरणे आढळून आली आहेत. यामध्ये गेल्या २४ तासात १२३० नवीन प्रकरणे वाढली आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत ८६८ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे त्यात गेल्या २४ तासात ३६ नवीन मृत्यू समोर आले आहेत. मृत्यू दर बघितला तर भारताचा ३.२४% आहे तर महाराष्ट्राचा ३.७५% इतका आहे. कालच्या प्रकरणांपेक्षा आज महाराष्ट्रात नवीन रुग्ण सपडण्याचा आकडा कमी आहे. काल हाच आकडा १२७८ एवढं होता.

कोणत्या राज्यात किती प्रकरणे:

पश्चिम बंगाल २६६३
मेघालय १३
गुजरात ८,५४१
मध्यप्रदेश ३६८५
महाराष्ट्र २३,४०१
कर्नाटक ८३२
हिमाचल प्रदेश ५९
आसाम ६५
राजस्थान ३९८८
तेलंगणा १२७५
उत्तरप्रदेश ३५७३
आंध्रप्रदेश २०१८
झारखंड १६०
पंजाब १८७७
हरियाणा ७३०
उत्तराखंड ६८
चंदिगड १७४
जम्मू व काश्मीर ८७९
दिल्ली ७२३३
बिहार ७४७
केरळ ५१९
ओडिसा ४१४
तमिळनाडू ८,००२
अंदमान व निकोबार ३३
अरूणाचल प्रदेश १
छत्तीसगड ५९
दादरा नगर हवेली १
गोवा ७
लडाख ४२
मणिपुर २
मिझोरम १
पुद्दूचेरी १२
त्रिपुरा १५२
एकूण ७०,७५६

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा