मुंबई, २५ डिसेंबर २०२०: नुकतीच ब्रिटनमध्ये कोरोनाचे नवीन स्वरूप समोर आल्याची खळबळजनक बातमी समोर आली. त्यानंतर राज्य सरकारने खबरदारी घेत मुंबईमध्ये नवीन नियमावली लागू केली. ज्या अंतर्गत ब्रिटन वरून येणाऱ्या प्रवाशांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, गेल्या महिन्यात ब्रिटन वरून मुंबईत दीड हजार प्रवासी आल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेने ब्रिटन वरून आलेल्या प्रवाशांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
ब्रिटन वरून सुमारे ३६९ प्रवासी मुंबईत परतले आहेत. ज्यामध्ये ठाणे शहरातील १३४, कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील ५५, वसई विहार मध्ये ४२ तर उल्हासनगर पालिका हद्दीतील १३ प्रवाशांचा समावेश आहे. नवी मुंबईतही ब्रिटन वरून ६४ प्रवासी आले असून नवी मुंबई पालिका या प्रवाशांचा शोध घेत आहे. नाशिक मध्ये देखील गेल्या महिनाभरात ब्रिटन वरून ६८ प्रवासी परत आले आहेत त्याऔचा नाशिक महानगरपालिका शोध घेत आहे.
गेल्या महिन्यात ब्रिटन वरून मुंबईत आलेल्या सर्व प्रवाशांचा शोध घेण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेने सर्व पालिकांना दिले आहेत. हे प्रवासी आले होते तेव्हा देखील यांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. मात्र, तरी देखील प्रशासनाने खबरदारी म्हणून पुन्हा चाचण्या करण्याचे आदेश दिले आहेत. ब्रिटनमध्ये नवीन स्ट्रेन सापडल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तज्ञांकडून असे सांगण्यात येत आहे की, व्हायरसचे हे नवीन स्वरूप अधिक वेगवान शमते ने संसर्ग वाढवण्यास सक्षम आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे