एकाच दिवसात तीन राज्यात भूकंपाचे धक्के, लडाख मध्ये ४.५ तीव्रता

लडाख, दि. २७ जून २०२० : कोरोना कहरात देशाच्या विविध भागातून भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. शुक्रवारी दुपारी हरियाणाच्या रोहतक आणि आसपासच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले, तर सायंकाळी उशिरा लडाख मध्ये ४.५ तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले.

शुक्रवारी रात्री ८.१५ वाजता लडाखमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र लडाखमध्ये होते. भूकंपाचे धक्के जमिनीच्या २५ किमी खोलीवरुन जाणवले. लडाखमध्ये भूकंपाची तीव्रता ४.५ होती. याआधी शुक्रवारी मेघालयातील तुरा येथे ७९ किमी पश्चिमेला भूकंप झाला. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ३.३ होती.

याआधी शुक्रवारी दुपारी ३.३२ वाजता हरियाणाच्या रोहतक आणि आसपासच्या भागात भूकंपाचा धक्का जाणवला. रिश्टर स्केलवर भूकंप २.८ होता. भूकंपाचे केंद्र जमिनीपासून ९ किमी अंतरावर रोहतक येथे होते. भूकंपाची तीव्रता फारशी नव्हती, त्यामुळे लोकांना धक्का जाणवला नाही. बुधवारीही रोहतक येथे दुपारी १२.५८ वाजता २.८ च्या तीव्रतेसह भूकंपाचा धक्का जाणवला. रोहतक येथे भूकंपाचे केंद्र जमिनीपासून आत ५ किलोमीटर अंतरावर होते.

त्याचबरोबर मिझोरममध्येही भूकंपाचे धक्के सतत जाणवत आहेत. मिझोरममध्ये चंपाई जिल्ह्यात बुधवारी दुपारी १.१४ वाजता सलग चौथ्या दिवशी भूकंप झाला. रिश्टर स्केलवर भूकंपाचे प्रमाण ४.५ होते. मंगळवारी रात्रीही मिझोरममध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. २१ जून रोजी मिझोरमसह आसाम, मेघालय आणि मणिपूरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ५.१ होती.

त्याचवेळी गुजरातमध्ये १५ जूनला भूकंप झाला. रिश्टर स्केलवर हा भूकंप ४.५ होता. भूकंपाचे केंद्रस्थळ कच्छपासून १५ किलोमीटर अंतरावर होते. त्याचवेळी १४ जून रोजी कच्छ येथे ५.५ तीव्रतेचा भूकंप झाला.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा