मुंबई, १० जून २०२१: मुंबईच्या मालाड पश्चिम येथील मालवणी भागात बुधवारी रात्री ११.१० वाजता चार मजली इमारत कोसळली. इमारत कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाला तर आठ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना बीडीबीए नगर जनरल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
इमारत कोसळताना काही मुलांसह बरेच लोक इमारतीच्या आत होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळ गाठले. स्थानिक पोलिस आणि लोकांच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या १५ लोकांना वाचविण्यात आले. अडकलेल्या लोकांसाठी अद्याप बचावकार्य सुरू आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) सांगितले की जवळील तीन इमारती “धोकादायक” स्थितीत आहेत आणि त्यांना देखील रिकाम्या करण्यात आल्या आहेत. मंत्री अस्लम शेख यांच्या म्हणण्यानुसार शहरातील मुसळधार पावसामुळे इमारत कोसळली. बुधवारी दिवसभर मुंबईत मुसळधार पाऊस पडला. यामुळे शहरातील काही भागात पाणी साचले आणि रस्ते व रेल्वे रुळही बंद पडले. भारतीय हवामान खात्याने येत्या चार दिवस मुंबईसह विविध जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे