मणिपूरमध्ये ४० दहशतवादी ठार ; मुख्यमंत्री बीरेश सिंह यांचा दावा

मणिपूर, २९ मे २०२३: मणिपूरमध्ये पुन्हा एकदा राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये विद्रोही गट आणि सुर‌क्षा यंत्रणांमध्ये चकमक झाली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी इम्फाल घाटी आणि आसपासच्या परिसरात ५ ठिकाणी हल्ल्याचा घटना घडल्या. आतापर्यंत ४० दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री बीरेश सिंह यांनी दिली आहे.

दहशतवादी समूहाविरोधात कारवाई करण्यात आली आहे ते लोक अत्याधुनिक शस्त्रांनी हल्ले करत होते. ते नागरिकांवर एम-१६ आणि एके-४७ असोल्ट रायफल आणि स्नाइपर गनचा वापर करत होता. दहशतवादी समूहाचे लोक अनेक गावांमध्ये घुसून घरे जाळणाच्या प्रयत्न करत होते. त्यामुळे सैन्य आणि अन्य सुरक्षा दलांनी फायरींग सुरू केली. दहशतवादी नि:शस्त्र नागरिकांवर हल्ले करून तोडमोड करत आहेत.

राज्य सचिवालयात बोलताना मुख्यमंत्री बीरेश सिंह यांनी सांगितले की, चकमक दोन समुदायांमध्ये नसुन कुकी अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, शांतता प्रस्थापित करण्यासाठी सैन्यने समुदायांना नि:शस्त्र करण्यासाठी शोध मोहीम सुरू केल्यानंतर पहाटेपासून चकमकीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ४० दहशतवादी ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा