गोल पोस्ट राष्ट्रीय 3 वर्षात 400 नवीन वंदे भारत ट्रेन, 100 गतिशक्ती कार्गोची योजना, बजेटमधून...

3 वर्षात 400 नवीन वंदे भारत ट्रेन, 100 गतिशक्ती कार्गोची योजना, बजेटमधून रेल्वेला मिळणार वेग!

रेल्वे अर्थसंकल्प 2022, 2 फेब्रुवारी 2022: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी संसदेत देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. रेल्वे अर्थसंकल्पाबाबत अर्थमंत्र्यांनी सांगितलं की, तीन वर्षांत 400 नवीन वंदे भारत गाड्या सुरू केल्या जातील.

निर्मला सीतारमन म्हणाल्या की, लहान शेतकरी आणि लघु आणि मध्यम उद्योगांसाठी रेल्वे नवीन उत्पादनं आणि कार्यक्षम लॉजिस्टिक सेवा विकसित करंल. त्याद्वारे स्थानिक उत्पादनांची पुरवठा साखळी वाढवण्यासाठी ‘एक स्टेशन, एक उत्पादन’ योजनाही सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळं देशाच्या विकासाला गती मिळंल. भारतीय रेल्वेचा वेग वाढवण्यासाठी 100 गतिशक्ती कार्गोचीही योजना आहे.

अर्थमंत्री म्हणाल्या की, देशात मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटीसाठी पीएम गति शक्ती-राष्ट्रीय मास्टर प्लॅन सुरू करण्यात आलाय. PM गतिशक्ती मास्टरप्लॅनमध्ये आर्थिक परिवर्तन, अखंड मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी आणि लॉजिस्टिक कार्यक्षमतेसाठी 7 इंजिनांचा समावेश असंल.

भारतीय रेल्वेचा वेग वाढवण्यासाठी 100 गतिशक्ती कार्गोचीही योजना आहे. नवीन वंदे भारत ट्रेन्स आणि नवीन व्हिस्टाडोम कोच भारतीय रेल्वेच्या क्षमतेत भर घालत आहेत. गेल्या 7 वर्षात 24000 किमी रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण झालं आहे.

2022-23 दरम्यान राष्ट्रीय महामार्गाची लांबी 25000 किमीपर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितलं. महामार्ग विस्तारीकरणासाठी 20 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version