४२ संघटनांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित

दिल्ली, १० मार्च २०२१: गृह मंत्रालयाने ४२ संघटनांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री डॉ किशन रेड्डी यांनी लोकसभेत सांगितले की, गेल्या तीन वर्षात दहशतवादी घटनांमध्ये घट झाली आहे आणि मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.लोकसभेत प्रश्नोत्तराच्या वेळी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात, गृह राज्यमंत्री किशन रेड्डी म्हणाले की, सरकारने ४२ संघटनांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले.
बेकायदेशीर गतिविधि (प्रतिबंध) कायदा -१९६७ च्या पहिल्या सूचित या संघटना टाकल्या गेल्या आहेत. सीमेपलीकडून भारतात दहशतवादसरकारने असे म्हटले आहे की सीमेपलीकडून भारतात दहशतवाद पसरवला जात आहे. देशात दहशतवादाशी संबंधित बहुतेक घटना सीमा ओलांडूनच प्रायोजित केल्या जातात. गेल्या तीन वर्षांत देशात आतंकवादी घटनेत घट झाली आहे.
आतापर्यंत एवढ्या आतंकवाद्यांना कंठस्थानए एन आय ने दिलेल्या वृत्तानुसार रेड्डी यांनी असे सूचित केले आहे की, केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीर मध्ये २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये आतंकवादी संघटनांमध्ये घट झाला आहे. २०१९ मध्ये जम्मू आणि काश्मीर मध्ये ५९४ आतंकवादी संघटना होत्या त्या २०२० मध्ये कमी होऊन २४४ झाल्या. एवढेच नाही तर यादरम्यान आतंकवाद्यांना देखील ठार करण्यात आले आहे. २०१९ मध्ये १५७ आतंकवादी ठार करण्यात आले होते. हा आकडा वाढून २०२० मध्ये २२१ वर पोहोचला होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा