गुणवत्ता चाचणीत ४८ औषधं ‘फेल’… मधुमेह, रक्तदाबाच्या औषधांचाही समावेश

नवी दिल्ली, २७ एप्रिल २०२३: नियमित वापरातील ४८ औषधं गुणवत्ता चाचणीत निर्धारित मानकांपेक्षा कमी असल्याचं सेंट्रल ड्रग्स स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनला आढळलं. यामध्ये नियमित वापरातील मधूमेह, रक्तदाबासह विविध आजारांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा समावेश आहे. ‘सीडीएससीओ’ च्या पाहणीनुसार, मार्चमध्ये देशातील अनेक उत्पादन युनिटमधून १४९७ औषधांचे नमुने घेण्यात आले होते.

गुणवत्ता तपासणीत नापास झालेल्या औषधांमध्ये डायबेटीस, रक्तदाब, कॅल्शिअम किंवा ह्रदयरोगाशी संबंधित औषधांचा समावेश आहे. मल्टी-व्हिटॅमिन औषधांपासून ते एचआयव्हीसाठी वापरल्या जाणाऱ्या रिटोनावीर तसेच गँबापेटिन, उच्च रक्तदाबासाठी वापरले जाणारे टेलमा, मधूमेहावरील औषध ग्लिमेपिराइड आणि मेटफॉर्मिन यांचाही या यादीत समावेश आहे. आयर्न आणि फॉलिक अॅसिडच्या गोळ्या तसेच मेस्वाक टूथपेस्टचेही या यादीत नाव आहे.

संबंधित औषधांची चाचणी केली असता आढळलं की, संबंधित औषध बनवण्यासाठी वापरलेली सामग्री प्रमाणित पातळीवर नाही, त्यातील घटकांचे प्रमाण किंवा चुकीचं लेबलिंग या कारणांमुळंही संबंधित औषधं गुणवत्ता चाचणीत निर्धारित मानकांची पूर्तता करण्यात अपयशी ठरलीय. नुकतेच केंद्र सरकारने निकृष्ट दर्जाच्या औषधांच्या प्रकरणी १८ फार्मा कंपन्यांचे परवानेही रद्द केले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा