मुंबई, 27 जून 2022: महाराष्ट्रात कोरोनाचा वेग भयावह झालाय. रविवारी राज्यात कोरोनाचे 6,493 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर शनिवारी 4,205 नवीन रुग्णांची नोंद झाली. याशिवाय रविवारी 5 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. सध्या राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 24 हजारांच्या पुढं गेली आहे. ही दिलासादायक बाब आहे की रविवारी 6213 बाधित लोकही कोरोनापासून बरे झाले आहेत.
राज्यात नवीन प्रकारातील पाच रुग्ण
बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांच्या अहवालानुसार, रविवारी राज्यात B.A.4 चे 2 आणि B.A.5 चे तीन नवीन रुग्ण आढळले आहेत. नवीन प्रकाराची लागण झालेले रुग्ण हे मुंबईतील रहिवासी आहेत. त्यांचे नमुने 10 ते 20 जून दरम्यान घेण्यात आले. यामध्ये 0-18 वयोगटातील एक रुग्ण, 26-50 वयोगटातील 3 आणि 50 वर्षांवरील एका रुग्णाचा समावेश आहे. या पाच रुग्णांमध्ये तीन पुरुष आणि दोन महिला आहेत. आता राज्यातील B.A.4 आणि B.A.5 च्या एकूण रुग्णांची संख्या 54 झालीय. त्यापैकी 15 रुग्ण पुण्यातील, 33 रुग्ण मुंबईतील, 4 रुग्ण नागपूरचे आणि दोन रुग्ण ठाण्यातील आहेत.
सक्रिय प्रकरणांची संख्या 24 हजारांवर
आता राज्यातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 24,608 झालीय. सर्वाधिक सक्रिय प्रकरणं मुंबईत 12,727 आणि त्यानंतर ठाण्यात 5,301 सक्रिय प्रकरणं आहेत. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 97.83 टक्के आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 77,90,153 लोक कोरोनामधून बरे झाले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे