बुलंदशहरमध्ये मद्यपान केल्यामुळे ५ जणांचा मृत्यू ,६ गंभीर

उत्तर प्रदेश ८ जानेवारी २०२१ :  बुलंदशहरमध्ये विषारी दारू पिऊन ५ जणांचा मृत्यू. १६ आजारी लोकांना विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यातील ६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रकरण सिकंदराबाद पोलीस स्टेशन परिसरातील जीत गढी गावचा आहे. या भागात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री केली जाते.
असे सांगितले जात आहे की, गुरुवारी गावातील काही लोकांनी मद्यपान केले होते, ज्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच वाईट झाली. त्यांना जिल्ह्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांच्या पथकाने ५ जणांला मृत घोषित केले. या प्रकरणात यूपी सरकारने उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाई केली आहे.
ग्रामस्थांचा आरोप  – पोलिसांच्या मर्जीने दारू विकली जात होती
दरम्यान, दारू माफिया आणि उत्पादन शुल्क विभागाच्या संगनमताने विषारी दारू विकली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पोलिसांनी सध्या तीन जणांना ताब्यात घेतले आहे. गावात एसडीएम आणि मोठ्या संख्येने पोलिस दल पाठविण्यात आले आहेत. येथे, बुलंदशहरचे एसपी संतोष कुमार यांनी दुर्लक्ष केल्याच्या आरोपाखाली स्टेशन प्रभारीसह ३ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे .
न्युज अनकट प्रतिनिधी – एस राऊत

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा