गोल पोस्ट गुन्हा पाकिस्तानात झालेल्या स्फोटात 5 ठार तर 10 जखमी

पाकिस्तानात झालेल्या स्फोटात 5 ठार तर 10 जखमी

चमन (पाकिस्तान), १० ऑगस्ट २०२०: पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतातील चमन शहरातील मॉल रोड भागात सोमवारी झालेल्या स्फोटात कमीतकमी पाच जण ठार आणि 10 जखमी झाले.

जिओ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, मृतदेह आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या स्फोटाची चौकशी करण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांची  अतिरिक्त तुकडी घटनास्थळी दाखल झाली, अशी माहिती जिओ न्यूजने दिली आहे.

चमन स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) नुसार हे स्फोटके एका भागात उभे असलेल्या मोटारसायकलवर बसविण्यात आले होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाच्या तीव्रतेमुळे या भागात पार्क केलेल्या मोटारसायकली आणि कारचे नुकसान झाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version