गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा लालसिंह चड्ढा’ चित्रपट कोरोना व्हायरसमुळे पुढच्या वर्षी रिलीज होणार

लालसिंह चड्ढा’ चित्रपट कोरोना व्हायरसमुळे पुढच्या वर्षी रिलीज होणार

मुंबई, 10 ऑगस्ट 2020: कोरोना व्हायरस या साथीच्या आजारामुळे अमीर खान आणि करीना कपूर यांचा चित्रपट  ‘लालसिंग चड्ढा’ ची रिलीज डेट २०२१ पर्यंत  पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच हा चित्रपट यावर्षी ख्रिसमसच्या दिवशी प्रदर्शित होणार होता, मात्र साथीच्या रोगामुळे पुढील वर्षी हा चित्रपट रिलीझ करण्यात येणार आहे.

चित्रपट समीक्षक आणि चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरवर ही बातमी शेअर केली आहे. त्यांनी लिहिले, “अमीर खान  आणि करीना कपूर खान यांचा ‘लालसिंग चड्ढा’ आता ख्रिसमस २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे . या चित्रपटात मोना सिंग देखील मुख्य भूमिकेत आहे.  ‘लालसिंग चड्डा’  हा १९९४ च्या अमेरिकन चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’ चा रीमेक आहे. 

अद्वैत चंदन दिग्दर्शित आणि आमिर खान प्रोडक्शन्सच्या विएकॉम १८ मोशन पिक्चर्ससह एकत्रित थ्री इडियट आणि तलाश सारखा चित्रपट केला आहे.  

न्यूज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version