राज्यातील ५ लाख लाडक्या बहिणी अपात्र, ‘असे’ आहेत निकष

30

विश्वजीत राळे, प्रतिनिधी

महाराष्ट्रात भाजपसाठी वरदान ठरलेल्या ‘लाडकी बहीण योजने’तील आतापर्यंत तब्बल ५ लाख अर्ज बाद करण्यात आले आहेत. नुकतीच याबाबतची माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. ज्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत, अशा महिलांना या योजनेतून वगळण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आदिती तटकरे यांंच्या एक्स हँडलवरून


काय आहे नेमकं प्रकरण?
२०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात मोठा फटका बसला होता. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जोरदार कमबॅक करत भाजपनं विरोधकांना धोबीपछाड दिला. भाजपच्या या विजयामागे अनेक कारणं असली, तरी लाडकी बहीण योजना ही भाजपसाठी गेमचेंजर ठरली असल्याची जोरदार चर्चा झाली.

आता याच लाडकी बहीण योजनेत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या योजनेसाठी अपात्र ठरलेल्या तब्बल ५ लाख महिलांचे अर्ज आतापर्यंत बाद करण्यात आले आहेत. जे अर्ज निकषांची पूर्तता करत नाहीत, अशा लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळण्यात आले आहे.

‘या’ महिला ठरल्या अपात्र

संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी महिला२ लाख ३० हजार
६५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या महिला १ लाख १० हजार
कुटुंबात चारचाकी गाडी असलेल्या महिला
+
नमोशक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या महिला
+
स्वेच्छेनं योजनेतून नाव माघारी घेणाऱ्या महिला
१ लाख ६० हजार
एकूण संख्या५ लाख



याआधी मिळालेल्या पैशांचं काय होणार?
लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये लाभ मिळत आहे. हे पैसे महिलांच्या थेट बँक खात्यात जमा होत आहेत. आता अर्जाची छाननी करण्याची प्रक्रिया अद्यापही सुरू आहे. त्यामुळे आणखीही महिला या योजनेसाठी अपात्र ठरू शकतात. मात्र ज्या महिला या योजनेतून अपात्र ठरतायेत, त्यांच्याकडून याआधी मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत, असेदेखील सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा