गणेश चतुर्थीला Jio Air Fiber लॉन्च होणार मुकेश अंबानी यांची घोषणा

मुंबई, २८ ऑगस्ट २०२३ : आजच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४६ वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बोलताना मुकेश अंबानींनी रिलायन्स, १९ सप्टेंबर म्हणजेच गणेश चतुर्थीला ‘जिओ एअर फायबर’ लॉन्च करणार असल्याची घोषणा केली आहे. Jio Air Fiber 5G नेटवर्क आणि अत्याधुनिक वायरलेस तंत्रज्ञान वापरून घर आणि कार्यालयांना वायरलेस ब्रॉडबँड सेवा प्रदान करेल. लॉन्च कार्यक्रम दुपारी २ वाजता सुरू होईल. मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजची एजीएम, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होस्ट करतील. लाँचिंग jio.com वेबसाइटवर लाईव्ह केले जाईल.

Jio Air-fiber एका दिवसात १५०,००० कनेक्शन देऊ शकते. फिजिकल फायबरद्वारे ब्रॉडबँड कनेक्शन प्रदान करण्यापेक्षा ते दहापट जलद आहे. मुकेश अंबानी यांनी असेही सांगितले की, जिओने गेल्या वर्षी १,१९,७९१ कोटी रुपयांची कमाई केली. त्याच वेळी, जिओचे ४५ कोटींहून अधिक वापरकर्ते आहेत. एक Jio वापरकर्ता एका महिन्यात सरासरी २५ GB डेटा वापरत आहे म्हणजेच प्रत्येक महिन्याला एकूण १,१०० कोटी GB डेटा वापरला जात आहे.

आरआयएलचे सीएमडी मुकेश अंबानी म्हणाले की, Jio हे नवीन भारताच्या डिजिटल परिवर्तनाचं प्रतीक आहे आणि Jio आपल्या ध्येयाकडे मोठी पावलं उचलली आहेत. Jio 5G चं रोलआउट जगातील कोणत्याही कंपनीद्वारे सर्वात वेगवान 5G रोलआउट आहे. Jio 5G मध्ये आपल्या अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रात बदल घडवून आणण्याची क्षमता आहे. यामध्ये कृषी, शिक्षण, एमएसएमई आणि आरोग्य सेवा यांचा समावेश आहे.

मुकेश अंबानी म्हणाले की, जिओ प्लॅटफॉर्म भारत-विशिष्ट AI मॉडेल्स आणि सर्व डोमेनमध्ये AI-शक्तीवर चालणाऱ्या सोल्यूशन्सच्या विकासाचे नेतृत्व करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे भारतीय व्यावसायिकांना आणि सरकारला AI चा लाभ मिळणार आहे. भारताला एआय-रेडी डिजिटल पायाभूत सुविधांची गरज आहे, जी AI ची प्रचंड संगणकीय मागणी हाताळू शकेल. आम्ही २००० मेगावॅट पर्यंत एआय-रेडी संगणकीय क्षमता निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहोत. तसेच गेल्या वर्षी आमच्या सर्व कंपन्यांनी २.६ लाख नोकऱ्या निर्माण करून नवीन विक्रम केला. आमच्या ऑन-रोल कर्मचार्‍यांची एकूण संख्या सुमारे ३.९ लाख आहे, असे मुकेश अंबानी म्हणाले आहेत.

या एजीएम बैठकीत अंबानी अलीकडेच लिस्टेड कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसशी संबंधित मोठ्या घोषणा करू शकतात अशी अपेक्षा आहे. याशिवाय रिटेल आणि टेलिकॉम बिझनेसच्या आयपीओची तारीखही जाहीर केली जाऊ शकते, ज्याची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. चार वर्षांपूर्वी २०१९ च्या एजीएम दरम्यान, रिलायन्सने सांगितले होते की ते पुढील ५ वर्षांमध्ये त्यांच्या टेलिकॉम आणि रिटेल व्यवसायांची बाजारात लिस्टिंग करतील.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा