१३ मे रोजी जालना लोकसभा निवडणुकीसाठी सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा- जिल्हाधिकारी

जालना १० मे २०२४ : जालना जिल्ह्यातील सुमारे १ लाख ४५ हजार नवमतदार पहिल्यांदा मतदान करणार आहेत. त्या सर्वांनी आपले मतदानाचे कर्तव्य करत मतदानाचा अधिकार बजवावा असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलंय. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी योग्य उपाययोजना जिल्हा प्रशासनातर्फे बूथ केंद्रावर राबविण्यात येत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता, निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावला जावा, यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलीय. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा जास्तीत जास्त मतदान करावे असे आवाहन देखील जालना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलंय. प्रत्येक मतदाराने १३मे रोजी जालना लोकसभा निवडणुकीसाठी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदानाचा हक्क बजावावा असं असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलंय.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा