मुंबई, २६ ऑगस्ट २०२१: राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप ओसरलेली नाही. अजुनही रोज मोठ्यासंख्येने नवीन कोरोनाबाधित आढळून येत आहेत. मागील काही दिवसांमध्ये दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या ही सातत्याने अधिक आढळून आल्यानंतर, राज्यात काल ५०३१ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४ हजार ३८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६२ लाख ४७ हजार ४१४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०४ टक्के आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,२८,४०,८०५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,३७,६८० (१२.२२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,९८,२६४ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. तर, २ हजार ३६९ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात आज रोजी एकूण ५० हजार १८३ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.
एकूण १५ जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १०० च्या खाली आहे. जळगाव (४१), नंदूरबार (१), जालना (८५), परभणी (२१), धुळे (१७), , हिंगोली (६१), नांदेड (३४), अमरावती (९३), अकोला (२१), वाशिम (१०), बुलढाणा (३४), यवतमाळ (६), नागपूर (९७), वर्धा (४), भंडारा (६), गोंदिया (४), गडचिरोली (२५) या पंधरा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १०० च्या खाली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे