पुण्यात दिवसभरात नवे ५ हजार ३९५ कोरोनाबाधित, नव्याने ४९ मृत्युंची नोंद !

पुणे, १६ एप्रिल २०२१: राज्यासह पुण्यात देखील कोरोना चा उद्रेक होताना दिसत आहे. पुणे शहरात काल नव्याने ५ हजार ३९५ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ३ लाख ४९ हजार ४२४ इतकी झाली आहे. तर काल शहरातील ४ हजार ३२१ कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या २ लाख ८९ हजार १२२ झाली आहे.

पुणे शहरात उपचार घेणाऱ्या ५४ हजार ३५१ रुग्णांपैकी १,१७२ रुग्ण गंभीर तर ५,४७८ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ४९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. कालच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ५ हजार ९५१ इतकी झाली आहे.

दिवसभरात २१ हजार ९२२ टेस्ट !

पुणे शहरात काल एकाच दिवसात २१ हजार ९२२ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता १८ लाख ०८ हजार ५९३ इतकी झाली आहे.

दिवसभरात १९ हजार २१९ व्यक्तींचे लसीकरण !

पुणे मनपा हद्दीत काल दिवसभरात १८६ केंद्रांवर १९ हजार २१९ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले.

■ आरोग्यसेवक : २२६ (१) | ३३३(२)
■ फ्रन्ट लाईन वर्कर्स : ८४६ (१) | ५२४ (२)
■ ज्येष्ठ नागरिक : ३,५४८ (१) | ३,४२० (२)
■ ४५+ : ९,१३० (१) | १,१९२ (२)

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा