शिंदवणे येथे रक्तदान शिबीरात ५० बाटल्या रक्त संकलित

15

शिंदवणे (हवेली), दि. १८ जून २०२० : कोरोना सारख्या महाभयंकर रोगामध्ये सध्या रक्ताचा भीषण तुटवडा जाणवत आहे व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, यांनी देखील वारंवार आपल्या व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये रक्ताचा तुटवडा भासत असल्याचे सांगितले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील जनतेला रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आव्हान केले आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक हित जपत हवेली तालुक्यातील शिंदवणे गावातील शिवसेना हवेली महिला आघाडीच्या नेत्या व महात्मा ग्रामीण पतसंस्थेचे उरळीकांचन संचालिका छाया महाडिक, यांच्या मार्गदर्शनाखाली “शिंदवणे युवा फाउंडेशन सह उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुप” यांच्या वतीने गुरुवारी दि.१८ जून रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.

यामध्ये जवळपास ५० रक्तपिशव्या संकलित झाल्या. या संकलित झालेल्या रक्तपिशव्या आपण राज्य सरकारला सुपूर्द करणार असल्याचे महात्मा ग्रामीण पतसंस्था संचालिका छाया महाडिक, यांनी बोलताना सांगितले. स्वच्छेने रक्तदान करणाऱ्या प्रत्येक नागरिकांना एक झाड व स्वच्छेने “महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण” परिषदेतर्फ प्रमाणपत्र देण्यात आले.

यावेळी कार्यक्रमास उरुळी कांचन वैद्यकीय अधिकारी डॉ. सुचेता कदम, मनोज महाडिक,जगदीश महाडिक, संतोष चौधरी, शिवाजी महाडिक, अँड. रमेश महाडिक, अभिजीत महाडिक, मुकेश महाडिक, संदीप महाडिक, नामदेव महाडिक, आदी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे