५० लाखाचा साप

साप म्हटला की सर्वसामान्यांना अंगावर काटा येतो. सापाबद्दल कुतूहल, भक्ती आणि भीती आजही आस्तित्वात आहे. यामुळे सर्पांबद्दल अंधश्रद्धा देखील आहे. तसेच विज्ञानाच्या नावाखाली देखील सर्पावरील संक्रात वाढत आहे. प्रचंड अंधश्रध्देमुळे सर्प प्रजाती मधील ‘मांडूळ’ हा सर्प मारला जात आहे. त्याच्या तस्करीचे वाढते प्रमाणही चिंतेची बाब ठरत आहे. आज बघुया खासरे वर मांडुळा विषयी माहिती…

शेतकऱयांचा मित्र अशी ओळख असलेल्या मांडुळांचा गुप्तधन आणि काळी जादू करण्यासाठी नाहक बळी दिला जात आहे. एक मांडूळ तब्बल २५ लाख रुपयांना विकले जात आहे. मांडूळ तस्करांनी ग्रामीण भागात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. मांडूळ शेतजमीन भुसभुशीत करण्याचे काम करतो. तसेच शेतीमालाला फस्त करणाºया उंदरांचा खात्मा करून एका प्रकारे शेतीचे रक्षण करतो. मात्र अलीकडे अंधश्रद्धेमुळे मांडूळांना २५ लाख रुपयांपर्यंत मागणी असल्याचे कळत आहे. गुप्तधनासाठी मांडूळांची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असल्यामुळे त्यांच्या संख्येत घट होत आहे. पूर्वी धन ठेवण्यासाठी बँका नसल्यामुळे जुने लोक धनाला घरात, शेतातील किंवा जमिनीखाली लपवून ठेवत असत. ते धन शोधण्यासाठी मांडूळांची मागणी मोठ्या प्रमाणावर असून, त्यासाठी मोठी रक्कमही मोजली जात असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

अंधश्रद्धा

असे असते मांडूळ रंग, काळा, चॉकलेटी व लालसर असतो. उंदीर, कीटक, पाली, सरडे हे त्याचे अन्न आहे. अन्न न मिळाल्यास मातीतील पोषक घटकांवर जगतो. मांडूळ घरात ठेवला तर धनलाभ होतो, पैसा मिळतो, मांडूळ गुप्तधनाचा शोध घेण्यास मदत करतो या विषयी काही लोक अंधश्रद्धा पसरवत आहेत. अशा व्यक्तींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. गुप्तधन शोधून देणे, पैशांचा पाऊस पाडणे, सेक्स वाढविणे, यासारख्या अंधश्रद्धेतून या सापाचा बळी दिला जात असल्याचे वन्यजीव संरक्षण संस्थेने नागरिकांशी केलेल्या चर्चेतून समोर आली आहे. या सर्पाला मोठी रक्कम देऊन नासा विकत घेते व अंतराळात पोचविते ही अफवाही तस्करांनीच पसरवली आहे. सर्प दोन्हीकडून चालतो, चावल्यास कृष्टरोग होतो, याच्या शरीरात विद्यूतशक्ती असल्याने टेस्टर लावल्यास ते लागते. मांडूळ, मांडवळ, रेड सँडबोआ या प्रचलीत नावांबरोबरच दोनतोंडी मालन म्हणून ओळख असलेला साप आहे.

डबल इंजीन म्हणून याची तस्करांमध्ये ओळख आहे. ५ लाखांपासून कोट्यावधी रुपयांपर्यंत याची किंमत ठरवली जाते. यासाठी रंग आणी वजन महत्वाचे ठरते. ५ फूटांचा, ४ किलो वजनाचा, डार्क चॉकलेटी रंगाचा मांडूळ ४ करोड रुपयांमधे विकला जाऊ शकतो, अशी चर्चा या तस्करांमध्ये असते. परंतु ही फसवेगीरी आहे. एवढा मोठा मांडूळ सर्प आढळणे अशक्य आहे. आढळल्यास ती दुर्मिळ घटना असू शकते. हा साप बिनविषारी असतो. कृपया कुठल्याही अफवांना बळी पडु नये.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा