मणिपूरमध्ये मुसळधार पावसाने भूस्खलन, महामार्ग ठप्प झाल्याने ५०० ट्रक अडकले

मणिपूर, १७ ऑगस्ट २०२३ : मणिपूरला मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात झोडपले आहे. मुसळधार पावसामुळे मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे. त्यामुळे इम्फाळ-सिलचर रोखला गेला असून ५०० मालवाहू वाहने अडकून पडली आहे. अशी माहिती तेथील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अद्यापतरी कोणत्याही जीवितहानीची माहिती मिळाली नाही. रस्ता मोकळा करण्याचे आणि वाहतूक पुन्हा सुरु करण्याचे काम सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भूस्खलनाचे प्रकार घडले आहे, असे ते म्हणाले दरड कोसळल्यामुळे किमान ५०० मालवाहू वाहने महामार्गाच्या विविध भागात अडकून पडली आहेत.

गेल्या वर्षी मणिपूरमध्ये जून महिन्यात जिल्ह्यात रेल्वेच्या बांधकामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन किमान ६१ जणांचा मृत्यू झाला होता. ३० जून रोजी जिरीबाम-इम्फाळ रेल्वे मार्गाच्या तुपुल रेल्वे यार्ड बांधकाम साइटवर भूस्खलन झाले होते.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा