सांगली जिल्ह्यातील सिंदूर येथे ५२ लाखाचा गांजा जप्त, शेतात लावली होती झाडं

सिंदुर- जत (सांगली), ३ नोव्हेंबर २०२०: सांगली जिल्ह्यातील सिंदुर येथे शेतात गांजाची लागवड करण्यात आली होती. सदर शेतामध्ये हळदीच्या पिकामध्ये ही गांजाची झाडं लावण्यात आली होती. पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल ५२० किलो गांजाची झाडं जप्त करण्यात आली आहे. या गांजाची किंमत जवळपास ५२ लाख रुपये आहे. पोलिसांनी ही कारवाई सोमवारी दुपारी केली असून यासंदर्भात आरोपी असलेल्या बसप्पा खुशाबा आक्कीवाट याला अटक करण्यात आली आहे.

या कारवाईची जत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या गांजाची किंमत सुमारे ५१ लाख ९३ हजार ३०० रुपये इतकी आहे. जतचे पोलीस निरीक्षक यांना गोपनीय बातमीदाराकडून सिंदूर येथील बसाप्पा आक्कीवाट यांच्या हळदीच्या पिकात बेकायदेशीर गांजाची लागवड केल्याची माहिती मिळाली आणि पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली आहे.

बेकायदेशीर गांजाची झाडं लागवड केल्याप्रकरणी बसाप्पा आक्कीवाट याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक महेश मोहिते, पोलिस जौंजाळ, विजय विर, हाक्के, थोरात, आगतराव मासाळ, चव्हाण, चव्हाण, उमर फकीर, मुजावर, शिंदे, खोत व माळी यांनी सहभाग घेतला. याचा शोध पोलिस निरीक्षक उत्तम जाधव करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा