औरंगाबाद, दि.१४ मे २०२०: औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी(दि.१३) रोजी दिवसभरात ३४ रुग्णांची वाढ झाली होती. त्यात आज (गुरुवारी) सकाळी पुन्हा ५५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे रुग्णसंख्या ७४३ वर पोहचली आहे.
शहरातील भीमनगर -१५, पडेगाव -१, उस्मानपुरा -७, सिल्कमिल्क कॉलनी – १, कांचनवाडी -१, नारळीबाग -१, आरटीओ -२, गरमपाणी -१, बन्सीलालनगर -१, सातारा -८, हुसेन कॉलनी -२, दत्तनगर -१, न्यायनगर -२, पुंडलिकनगर -1, संजयनगर, मुकुंदवाडी -3, गुरूनगर -१, नंदनवन कॉलनी -१, गारखेडा -१, शहनुरवाडी -१, पंचशील दरवाजा -१, बेगमपुरा -१, अन्य-२, असे ५५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या ७४३ झाली आहे.
बुधवारी दिवसभरात ३४ रुग्ण वाढले होते. त्यामध्ये चार गरोदर महिलांचा समावेश आहे. त्यापैकी तीन महिलांची प्रसूती झाली असून त्यांचे बाळ व आई सुखरूप आहेत. अशी माहिती डॉ. श्रीनिवास यांनी दिली.
शहराच्या नवनवीन भागात कोरोनाचा शिरकाव होऊ लागल्याने हॉटस्पॉटची संख्याही वाढत आहे. बुधवारी पाच नवीन हॉटस्पॉटची वाढ झाली. तर दिवसभरात ४ रुग्णांचे बळी गेल्याने मृतांचा आकडा १९ झाला आहे. आतापर्यंत एकूण २१० रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: