कॅलिफोर्नियामध्ये ६.४ तीव्रतेचा भूकंप, कोसळल्या इमारती, अनेक रस्त्यांचं नुकसान

15

कॅलिफोर्निया, २१ डिसेंबर २०२२: मंगळवारी (२० डिसेंबर) उत्तर कॅलिफोर्नियाच्या किनारपट्टीवर भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.४ इतकी मोजली गेली. भूकंप इतका जोरदार होता की शहरातील एक पूल आणि अनेक रस्त्यांचं नुकसान झाले. त्यामुळं दोन जण जखमीही झाले आहेत. तेथे हजारो घरांची वीज खंडित झाली. सॅन फ्रान्सिस्कोच्या उत्तरेस २१५ मैल (३५० किमी) अंतरावर झालेल्या भूकंपामुळे शहरात गॅस गळती झाली, वीजवाहिन्या खाली पडल्या आणि इमारतीला आग लागली. जी लवकरच विझली. इतर दोन इमारतीही कोसळल्या.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, विभागाला भूकंपानंतर पहाटे २.३४ वाजता (१०३४ GMT) ७० आपत्कालीन कॉल प्राप्त झाले होते, ज्यात एक व्यक्ती अडकल्याचा आणि बचावाची गरज असल्याच्या बातम्यांचा समावेश होता. शेरीफच्या कार्यालयानं सांगितलं की हम्बोल्ट काउंटीमधील भूकंपाच्या केंद्राजवळ दोन लोक जखमी झालेत, जेथे रस्ते आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. स्थानिक प्रसारमाध्यमांनी शेरीफच्या कार्यालयाचा हवाला देत सांगितलं की, जखमींपैकी एकाच्या डोक्याला दुखापत झाली असून दुसऱ्याचं माकड हाड तुटलं आहे.

सध्या तरी भूकंपामुळं मृत्यू झाल्याची कोणतीही माहिती नाही. कॅलिफोर्निया पोलिसांनी सांगितलं की, पुलाला चार मोठी दरड पडण्याचा आणि रस्ता खचण्याचा धोका लक्षात घेऊन ईल नदीवरील फर्न्डेल पूल बंद करण्यात आलाय. मोठ्या भेगा पडल्यामुळं अधिकार्‍यांनी हम्बोल्ट परगण्यात किमान चार रस्ते बंद केले आहेत आणि संभाव्य गॅस लाइन फुटण्याची चौकशी करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे