‘वंदे भारत’ मिशन अंतर्गत ६,०३७ भारतीय परतले मायदेशी

नवी दिल्ली, दि. १३ मे २०२०: वंदे भारत मिशन अंतर्गत दिनांक ७ मे २०२० पासून आत्तापर्यंत एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसच्या ३१ हवाई उड्डाणांद्वारे ६,०३७ भारतीयांना मायदेशी आणण्यात आले आहे. दिनांक ७ मे २०२० पासून भारत सरकारने  परदेशातील भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी वंदे भारत मिशन ही सर्वात मोठ्या मोहिमांपैकी एक मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत हवाई उड्डाण मंत्रालय, परदेश म़ंत्रालय आणि राज्य सरकार यांच्याशी समन्वय साधून भारतीयांना मायदेशी आणण्याचे कार्य करत आहे.

एअर इंडिया आणि तिची उपशाखा एअर इंडिया एक्प्रेस यांनी मिळून आपल्या एकूण ६४ विमानफेऱ्यांद्वारे अमेरिका, इंग्लंड, बांगलादेश,
सिंगापूर, सौदी, अरेबिया, कुवेत, फिलीपाईन्स, युएई आणि मलेशिया अशा बारा देशांतून पहिल्या टप्प्यात ६४ विमानफेऱ्या करून (४२ एअर इंडियाच्या आणि २४ एअर इंडिया एक्स्प्रेस ) १४,८०० भारतीयांना मायदेशी आणले आहे.

या मोठ्या स्थंलातर मोहिमेवेळी भारत सरकारने आणि डीजीसीएने घालून दिलेल्या सर्व संरक्षक आणि स्वच्छतेच्या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करण्यात आला. या संवेदनशील वैद्यकीय स्थलांतर मोहिमेवेळी हवाई उड्डाण मंत्रालय, एएआय, एअर इंडिया यांनी प्रवासी, हवाई कर्मचारी आणि विमानतळावरील इतर कर्मचारी यांच्या सुरक्षेत कोणतीही कसूर  ठेवली नाही. सरकारच्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे अत्यंत काटेकोर दक्षता यावेळी पाळण्यात आली.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा