ट्विटरवर ब्लू टिकसाठी दरमहा द्यावे लागणार ६६० रुपये, मस्क यांची घोषणा, मिळतील या चार सुविधा

पुणे, २ नोव्हेंबर २०२२: टेस्लाचे मालक आणि अब्जाधीश एलोन मस्क ट्विटर विकत घेतल्यानंतर एकामागून एक मोठे निर्णय घेतायत. दरम्यान, त्यांनी मंगळवारी रात्री उशिरा (भारतीय वेळेनुसार) ट्विटरवरील व्हेरिफाय अकाउंटसाठी शुल्क निश्चित केलंय.

मस्क यांनी एकामागून एक ट्विट करून ही माहिती दिलीय. वास्तविक, आपल्या ट्विटमध्ये, ट्विटरचे नवीन मालक, मस्क म्हणाले की, वापरकर्त्यांना ब्लू टिक्ससाठी ८ डॉलर फी म्हणून भरावे लागतील. मात्र, देशानुसार शुल्क वेगवेगळं असंल, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

भारतात Twitter Blue सबस्क्रिप्शनची किंमत किती असंल हे सध्या स्पष्ट नाही. सहसा इतर सब्सक्रिप्शन सर्विस यूएस मध्ये अधिक महाग असतात, परंतु भारतात त्यांची किंमत कमी असते. उदाहरणार्थ, Netflix ची सब्सक्रिप्शन सर्विस सर्वात स्वस्त आहे.

विशेष म्हणजे ट्विटरचे मालक एलोन मस्क यांनी स्वत: ट्विट करून Twitter Blue सबस्क्रिप्शनची किंमत जाहीर केलीय. यासोबतच त्यांनी ब्लू सबस्क्रिप्शन अंतर्गत लोकांना कोणते फायदे मिळतील हे देखील सांगितलंय.

ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन अंतर्गत ही वैशिष्ट्ये उपलब्ध असतील:

रिप्लाय, मेन्शन आणि सर्च मध्ये प्राधान्य दिलं जाईल. एलोम मस्क यांच्या मते, या वैशिष्ट्यामुळं स्पॅम आणि स्कॅम यांना आळा बसंल.

Twitter Blue सबस्क्रिप्शन अंतर्गत, युजर्स आता लॉंग ड्युरेशन व्हिडिओ आणि ऑडिओ पोस्ट करू शकतील.

Twitter Blue सब्सक्रिप्शन सर्विस ऍक्टिव्ह केल्यास सामान्य युजर्सच्या तुलनेत निम्म्या पेक्षा कमी जाहिराती पाहायला मिळतील.

मस्क यांनी असंही म्हटलंय की जर पब्लिशर्सनी ट्विटरशी कॉन्ट्रॅक्ट केला असंल तर ट्विटर Twitter Blueचे सब्सक्राइबर्स पेड आर्टिकल देखील विनामूल्य वाचू शकतात.

इलॉन मस्क यांच्या म्हणण्यानुसार, ट्विटर ब्लू सब्सक्रिप्शनमुळं ट्विटरच्या कमाईत वाढ होईल आणि कंटेंट क्रिएटर्सना रिवॉर्ड्सही मिळतील.

Twitter वरून रेवेन्यू जनरेट करण्यासाठी सदस्यता सेवा

ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शननंतरही मस्क थांबणार नाहीत. कारण त्यांनी ट्विटर विकत घेण्यासाठी खूप पैसा गुंतवलाय. अशा परिस्थितीत त्यांना ट्विटरवरून पैसे मिळवायचे आहेत. बरेच दिवस ट्विटर फारसं फायद्यात नसल्यामुळं आता ते नवीन निर्णय घेऊन पैसे कमवण्याचा प्रयत्न करणार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा