तुतीकोरीन, दि. १ जुलै २०२०: कोविड -१९ च्या कारणामुळे देशाबाहेर अडकलेल्या भारतीय जनतेला पुन्हा देशात आणण्यासाठी ‘समुद्रसेतु’ मोहीम सरकारकडून राबवण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत इराणमध्ये अडकलेल्या ६८७ भारतीयांना आज (बुधवार) आय एन एस जलाश्व च्या सहाय्याने तमिळनाडूमधील तूतीकोरिन येथे आणण्यात आले.
समुद्रसेतु मोहिमेच्या अंतर्गत इराणचे बंदर अब्बास पासून ते तूतीकोरिन बंदर पर्यंत वसवण्यात आले. थुथुकुड़ी, कन्याकुमारी आणि तमिळनाडूच्या किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांमधील मच्छिमार लॉकडाउनच्या कारणामुळे इराणमध्ये अडकून बसले होते. या मच्छीमारांकडून सरकारकडे भारतात येण्यासाठी विनंती करण्यात आली होती.
यापूर्वी ११ जून रोजी आयएनएस शार्दुलने २३३ भारतीयांना इराणहून आपल्या देशात परत आणले होते. ऑपरेशन समुद्र सेतू हा वंदे भारत मिशनचा एक भाग आहे, ज्या अंतर्गत कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यामुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना त्यांच्या देशात परत आणले जात आहे.
भारतीय नौदलाने ८ मे रोजी ऑपरेशन समुद्र सेतू मोहीम सुरू केली होती. यापूर्वी मालदीव आणि श्रीलंका येथील २,८७४ कर्मचाऱ्यांना कोची आणि तूतीकोरिन बंदरावर पोहोचवले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी