६ वीतल्या विद्यार्थिनिवर १० शिक्षकांनी केला बलात्कार……

राजस्थान, ४ ऑगस्ट २०२० : भारतात बलात्काराच्या घटना या दिवसेंंदिवस वाढत चालल्या असून भारतात पुन्हा एकदा माणुसकीला लाजवेल असे कृत्य राजस्थानमध्ये घडले आहे. राजस्थामध्ये शिक्षकानेच विद्यार्थीनीवर आत्याचार केल्याची घटना घडली आहे.

शिक्षक जो आयुष्यात चांगले कर्म करण्याची शिकवण देतो जर तोच शिक्षक हा भक्षक झाला तर काय वाईट परिस्थिती निर्माण होईल याची कल्पना देखील करवत नाही. पण राजस्थानमध्ये ६ वीत शिकण्या-या विद्यर्थिनीवर एक दोन नाही तर दहा शिक्षकांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

राजस्थानच्या अलवर जिल्हातील नारायणपुर परिसरातील हि घटना असून या प्रकरणी शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेव्हा शिक्षक मुलीच्या घरी आले असता त्यांना पाहून मुलगी रडायाला लागली. तेव्हा हे प्रकरण उघडीस आले. या घटने नंतर संपुर्ण परिसरात खळबळ माजली असून तेथील लोकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा