लांडग्याच्या हल्ल्यात ७ शेळ्या  मुत्युमखी तर ६ जखमी

इंदापूर, २७ ऑक्टोबर २०२० : इंदापुर तालुक्यातील शेटफळ गढे येथे लांडग्याच्या हल्ल्यात सात बकऱ्या मुत्युमखी पडल्या तर सहा जखमी झाल्याची घटना आज पहाटे घडली.

शेटफळ गढे येथील शेतकरी राहूल जनार्दन वाबळे यांच्या शेतामध्ये त्यांच्या ७ बकऱ्या लांडग्याच्या हल्यात मुत्यमुखी पडल्या आहेत तर .६ बकऱ्या जखमी झाल्या आहेत. याबाबत वनविभागाला माहिती दिली असून.वाबळे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.आधीच अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे.तर या हल्यात नुकसान जाहले आहे.असे हताश पणे वाबळे यांनी सांगितले. वनविभागाने  घटनास्थळावर पोहचून वनपाल घावटे, वनरक्षक कांबळे, बंडू कुंभार, कांबळे यांनी पाहणी करून पंचनामा केला.तर लांडग्याला पकडण्यासाठी सापळा लावणार असल्याचे घावटे यांनी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा