झाडांची छाटणी पडली महागात ७० ते ८० पक्षांचा मृत्यू….

राजगुरूनगर, १८ जुलै २०२० : झाडांची कापणी पक्ष्याच्या मुळावर बेतली असुन ७० ते ८० पानकावळे व बगळ्याची पिल्ले मूत्यूमुखी पडले आहे. तहसिलदार कचेरी,पोस्ट ऑफिस येथील झाडांची छाटणी केल्यामुळे पक्ष्यांची घरटी जमिनीवर पडून लहान पिल्ले जखमी होऊन मृत्यू पावले असल्याची घटना राजगुरूनगरमध्ये घडली आहे. या घटनेबाबत प्राणीमित्रांनी मात्र संताप व्यक्त केला आहे.

राजगुरूनगर येथील तहसीलदार कचेरी येथे वडाचे झाड व पोस्ट ऑफिसजवळ अशोकाची झाडे आहेत. या झाडांची उंची वाढली आहे. तसेच या ठिकाणी पक्षांचा सहवास असल्याने त्यांची विष्ठा पडते. त्याची दुर्गंधी पसरत असल्याने या झाडांची छाटणी करण्यात आली. या छाटणीत अनेक पक्ष्यांची घरटी उद्ध्वस्त झाली.

राजगुरुनगर येथील रेस्क्यू टीम मधील सदस्यांनी पुण्यामधील वाईल्डलाईफ रेस्क्यू टीम सोबत संपर्क साधत या घटनेची माहिती दिली. एक तासातच पुण्यातील टीम त्यांची गाडी घेऊन डॉक्टरांसोबत घटनास्थळी पोहचली. त्यांना सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बगळा आणि पानकावळा यांची जवळपास १०३ पिल्ले सापडली. ती सर्व जमिनीवर इकडे तिकडे झाडांच्या फांद्या खाली अडकली होती. त्यातील ७० ते ८० पिल्ले मृत अवस्थेत भेटली.

जिवंत असणाऱ्या सर्व पिल्लांना डॉक्टरांनी लसीकरण केले. व सर्व पिल्ले ताब्यात घेतली. यावेळी चेतन गावडे,नागेश थिगळे, निलेश वाघमारे, महेश यादव, सागर कोहिनकर, प्रिया गायकवाड, ब्रिजेश गायकवाड, जीवन इंगळे, या राजगुरुनगर शहरातील प्राणी मित्रांनी जखमी पिल्ले गोळा करण्यास मदत केली. बगळा व पानकावळा अशा १०३ जिवंत पिल्लांना जीवनदान देत ताब्यात घेऊन सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे.


न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा