७० वर्षात देशाने जे काही कमावलं ते मोदींनी विकलं, राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका

नवी दिल्ली, २५ ऑगस्ट २०२१ : राष्ट्रीय विमुद्रीकरण योजनेच्या (एनएमपी) घोषणेला “तरुणांच्या भविष्यावर” हल्ला असल्याचे सांगत, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी सरकारवर हल्ला चढवला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ७० वर्षांत देशाची जी संपत्ती तयार झाली होती ती सर्व संपत्ती काही उद्योगपतींना विकली आहे अशी टीका देखील केली. काही कंपन्यांना ही “भेट” दिल्याने त्यांच्यावर मक्तेदारी निर्माण होईल, असा दावाही त्यांनी केला, ज्यामुळे देशातील तरुणांना रोजगार मिळू शकणार नाही.

राहुल गांधी यांनी माजी अर्थमंत्री पी चिदंबरम आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल आणि रणदीप सुरजेवाला यांच्यासह एनएमपी मुद्द्यावर पत्रकारांना संबोधित केले. काँग्रेसचे माजी अध्यक्ष म्हणाले, नरेंद्र मोदी जी आणि भाजपचा नारा होता की ७० वर्षात काहीही झाले नाही. मात्र काल अर्थमंत्र्यांनी ७० वर्षांत जी काही देशाची संपत्ती तयार झाली होती तिला विकण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच पंतप्रधानांनी ७० वर्षात देशाने जे काही तयार केलं ते सर्व विकण्याचा निर्णय घेतला आहे.

एनएमपीचा तपशीलवार उल्लेख करताना ते म्हणाले, “या मालमत्ता तयार करण्यासाठी ७० वर्षे लागली आहेत आणि देशातील लोकांनी लाखो कोटी रुपये खर्च केले आहेत. आता ते तीन-चार उद्योगपतींना भेट म्हणून दिले जात आहेत. राहुल गांधी म्हणाले, आम्ही खाजगीकरणाच्या विरोधात नाही. आमच्या काळात खाजगीकरण तर्कसंगत होते. त्या वेळी सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या मालमत्तांचे खासगीकरण करण्यात आले नव्हते. आम्ही त्या उद्योगांचे खाजगीकरण करायचो चे उद्योग व कंपन्या नुकसानीत चालू होते.

त्यांनी आरोप केला, “काही कंपन्यांची मक्तेदारी निर्माण करण्यासाठी हे सर्व केले जात आहे. जसजशी त्यांची मक्तेदारी वाढेल, तसतसा रोजगार कमी होईल. नरेंद्र मोदी जी आपल्या दोन-तीन उद्योगपती मित्रांसह तरुणांच्या भविष्यावर हल्ला करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा