राज्यात मोफत उपचारांसाठी ७०० दवाखाने सुरू करणार; अर्थमंत्र्यांची घोषणा

मुंबई, ९ मोर्च २०२३ : राज्यात ‘आपला दवाखाना’ या उपक्रमाला उत्स्फूर्त लाभला आहे. आता संपूर्ण राज्यामध्ये हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे ७०० ‘आपला दवाखाना’ सुरू करण्यात येतील. त्याद्धारे मोफत उपचार करण्यात येतील, अशी घोषणा राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता.९) केली आहे.

विधानसभेत राज्याचा २०२३-२०२४ चा अर्थसंकल्प सादर करीत आहेत. यात फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. मोदी सरकारच्या पीएम किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधीची घोषणा केली. केंद्र सरकारचे शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये मिळत असून, त्यात राज्य सरकार आणखी ६ हजार रुपये घालणार आहे.

यामुळे शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार रुपये मिळतील. याचा १.१५ कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ होणार आहे. तर याचा ६,९०० कोटी रुपायांचा भार राज्य सरकार उचलाणार आहे, अशी घोषणा फडणवीस यांनी अर्थसंकल्पात केली आहे; तसेच सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, पर्यावरणपूरक विकास याचा समावेश असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा