नवी दिल्ली, ३१ जुलै २०२० : वयाच्या ७३ व्या वर्षी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना गुरुवारी रुटीन चाचणीसाठी सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिली.त्यांना “रुटीन टेस्ट आणि तपासणी” साठी रात्री ७ वाजता दिल्लीतील खासगी सुविधा येथे दाखल करण्यात आले असून”त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे,” अशी माहिती रुग्णालयाच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. डी. एस. राणा यांनी दिली
फेब्रुवारीमध्ये सोनिया गांधी यांना पोटदुखीची तक्रार आल्यानंतर याच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.यापूर्वी आज सोनिया गांधी यांनी पक्षाच्या राज्यसभा सदस्यांसमवेत बैठक घेतली आणि त्यांच्याशी सद्य राजकीय परिस्थितीविषयी चर्चा केली. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह प्रमुख नेत्यांनी भाग घेतला होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी