अलीगड केंद्रात डॉक्टरांनी केले ५० लाखांचे जेवण……

अविगत, ३१ जुलै २०२० : कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊनमध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर अनेकजण बेरोजगारीच्या चक्रात आडकले आहेत. अशातच हॉटेल चालकांनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हॉटेल उघडल्यानंतरही अनेक हॉटेलमध्ये पैसे कमी होत आहेत.खरं तर उत्तर प्रदेशच्या अलीगड क्वारंटाईन सेंटरमध्ये २८ दिवसात ८४ डॉक्टरांचे खाण्याचे बिल हे तब्बल ५० लाखांवर गेले आहे.अतिरिक्त मुख्य सचिव वैद्यकीय डॉ. रजनीश दुबे हे बिल पाहून आश्चर्यचकित झाले आहेत, परंतु त्याचवेळी त्यांनी नियम नमूद करून हे बिल भरण्यास नकार दिला आहे.

हॉटेल चालक यांनी आपले मत मांडत “वीज बिलापासून हॉटेल कर्मचारी नियमित पगार देत आहेत.आता शहरातील ४ हॉटेल्स जिल्हा प्रशासनाद्वारे पाम ट्री डेव्हलपमेंट हॉटेलमार्फत उघडली गेली ज्यामध्ये कोरोना योद्धा म्हणून ओळखल्या जाणार्‍या डॉक्टरांना ठेवण्यात आले आहे”. शहरातील चारही हॉटेल्समध्ये २८ दिवसांसाठी हे ८४ डॉक्टर राहात होते.जिल्हा प्रशासनाने मार्चपासून कोणत्याही हॉटेल चालकाला थकबाकी दिली नाही.

५० लाख रुपयांची थकबाकी असून जिल्हा प्रशासन पैसे देत नाही.आम्हालाही आमच्या कर्मचार्‍यांना पगार द्यावा लागतो आणि वीज बिल भरणे आवश्यक आहे, जर आमच्याकडे पैसे नसतील तर हे सर्व कोठून भरावे.असे हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष मानव महाजन यांनी व्यक्तव्य केले.त्याचबरोबर महाजन पुढे म्हणाले की थकीत रक्कम लवकर न मिळाल्यास आम्ही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहू आणि गरज भासल्यास आम्ही भेटू.

या प्रकरणावर अलिगडचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.भानू प्रतापसिंह कल्याणी म्हणाले की आमच्याकडे इतके पैसे नाहीत, पण आता व्यवस्था करावी लागेल.आम्हाला वाटले की शासन स्तरावरून काही मदत मिळेल पण आता स्वत:च्या स्तरावरच काहीतरी केले पाहिजे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा