बकोरीच्या डोंगरावर ७५ वर्षांच्या आजीबाईंनी वृक्षारोपण करून केला पणतूचा वाढदिवस साजरा..!

वाघोली, ३१ जुलै २०२०: येथे आज दि. ३१ जुलै २०२० रोजी सकाळी संगमवाडी येथील ७५ वर्षाच्या आजीबाईने पणतू युवांश यांचा वाढदिवस बकोरी , ता. हवेली येथील डोंगरावर वृक्षारोपण करून मोठ्या उत्साहाने साजरा केला बकोरी येथील डोंगरावर माहिती सेवा समिती व दादा बाबाजी वारघडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून मागील काही वर्षापासून वृक्षारोपण करण्यात येत आहे.

आजपर्यंत हजारो देशी झाडे लावून त्यांचे संगोपन केले जात आहे उजाड माळरानावर नटलेल्या वनराई बाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून रोज माहिती दिली जाते सोशल मीडियाच्या माध्यमातून बकोरी येथील डोंगरावर नटलेल्या हिरवेगार वनराईची माहिती संगमवाडी येथील आजीबाईंना कळली आणि आजीबाईंनी आपल्या पणतूचा वाढदिवस बकोरीच्या डोंगरावर साजरा करण्याचा निर्णय घेतला शुक्रवार दि. ३१ जुलै रोजी सकाळी आजीबाईने कुटुंबासह पणतूला घेऊन बकोरी डोंगर गाठला बकोरीच्या डोंगरावर आल्यानंतर ५१ देशी झाडांची लागवड करून आपल्या लाडक्या पणतूचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला.

दरम्यान आजीबाईने हिरव्यागार निसर्गरम्य डोंगरावर फेरफटका मारून आनंद घेतला व श्रावण महिना असल्यामुळे आजीबाईंच्या हस्ते बेलाची झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आले आजीबाई श्रीमती यमुनाबाई नानासाहेब सोरटे, वय ७५ ह्या संगमवाडीच्या उद्योजक संजय सोरटे, यांच्या मातोश्री आहेत सोरटे यांनी ५१ देशी झाडांचे वृक्षारोपण केले श्रावण महिन्याचे औचित्य साधून त्यांच्या आई यमुनाबाई सोरटे यांच्या हस्ते बेलाची झाडे लावण्यात आली आहेत.

यावेळी माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे, संजय सोरटे, श्रुती सोरटे, माजी उपसरपंच शांताराम कोलते, राजन कुटे, धनराज वारघडे, चंद्रकांत वारगडे, यांच्या उपस्थित वृक्षारोपण संपन्न झाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी-ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा