वारंगल, २८ नोव्हेंबर २०२२ : तेलंगणातील वारंगल शहरात वडिलांनी परदेशातून आणलेले चॉकलेट खाल्ल्याने गुदमरून आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.
संदीप सिंह असे या मुलाचे नाव आहे. संदीप इयत्ता दुसरीत शिकत असून शनिवारी घरातून चॉकलेट घेऊन शाळेत गेला होता. हे चॉकलेट खात असताना ते त्याच्या घशात अडकले. त्यामुळे त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. याबाबत शाळेतल्या शिक्षकांनी शाळेच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर त्याला एम जी एम रुग्णालयात नेण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील इलेक्ट्रॉनिक दुकान चालविणार्या कंगन सिंहच्या कुटुंबात ही घटना घडली. कंगन सिंह हा मूळचा राजस्थानचा रहिवासी असून तो सुमारे २० वर्षांपूर्वी वारंगळला गेला होता आणि तेथे तो आपल्या कुटुंबासह राहत होता. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या ट्रिपवर गेलेल्या कंगन सिंह यांनी मुलांसाठी तेथील चॉकलेट्स आणली होती. संदीप त्यातील काही चॉकलेट घेऊन शाळेत गेला होता. चॉकलेट खाताना ते घशात अडकले, त्यांनंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र श्वास घेण्यास त्रास झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.