९ लाख रुपयांच्या गुटख्यासह एक आरोपी जेरबंद

जालना, दि. १८ जुलै २०२०: राज्यात गुटखा बंदी करण्यात आली असली तरी अवैधरित्या गुटखा विकला जात आहे. यासंदर्भात जालना स्थानिक गुन्हे शाखेकडून विशेष कारवाई करून जालना जिल्ह्यातील पिरसावंगी येथे छापा टाकून ९ लाखाच्या अवैध गुटख्यासह एका आरोपीस जेरबंद करण्यात आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.राजेंद्रसिंह गौर यांना त्यांचे खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की, पिरसावंगी ता. बदनापुर येथे आरोपी कृष्णा सुभाष कातुरे याने त्याच्या घरामध्ये महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गुटखा व जर्दा तंबाखु पदार्थ याची अवैधरित्या बेकायदेशीर विक्री करण्याकरीता साठवून ठेवलेला आहे. अशी बातमी मिळाली. बातमी मिळताच श्री. राजेंद्रसिंह गौर, यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करुन संबंधीत गुटखा विक्रेत्यावर कार्यवाही करण्याचे नियोजन केले.

त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पिरसावंगी ता. बदनापुर येथे जाऊन आरोपी कृष्णा सुभाष कातुरे याचे घरी छापा मारला. त्या ठिकाणी आरोपी सुभाष कातुरे( २६) रा. पिरसावंगी ता.बदनापुर जि.जालना हा मिळुन आला. त्याचे घराची झडती घेतली असता घरामध्ये राजनिवास गुटखा ( ७५ ) बॅग, एमपी- १, जाफराणी जर्दा ( ३२ ) बॅग , विमल पानमसाला ( ४० ) बॅग, वी आय टोबॅगो ( ४० ) बॅग, गोवा गुटखा ( २२ ) बॅग, जीवन गुटखा ( ५५ ) पुडे असा एकुण ९ लाख ४१ हजार ३१० रुपये किंमतींचा महराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा मिळुन आला आहे. सदर प्रतिबंधीत गुटखा व जर्दा हा त्याच्या मालकीचा असुन त्याने तो संदिप दत्तात्रय भुमकर रा. राजुर ता. भोकरदन याचे कडुन विकत आणला असल्याचे सांगितले आहे.

आरोपी व मुद्येमाल पुढील कार्यवाही करिता ताब्यात घेण्यात आले आहे . सदर व्यक्ती विरुध्द श्री. संजय चट्टे, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन जालना यांच्या फिर्यादी वरुन पोलीस ठाणे बदनापुर येथे भा.द.वि तसेच अन्न सुरक्षा आणी मानदे अधिनियम २००६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

सदरची कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक श्री.एस.चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक श्री.समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, श्री.राजेंद्रसिंह गौर, स्थानिक गुन्हे शाखा जालना पोउपनि दुर्गेश राजपुत, पोहेकॉ सॅम्युअल कांबळे, कैलास कुरेवाड, पोना प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे सचिन चौधरी, हिरामन फलटणकर, पोकॉ विलास चेके, रवि जाधव महिला कर्मचारी शमशाद पठाण यांनी केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा