जलविद्युत प्रकल्पातील अडकलेल्या ९ जणांचा आगीत होरपळून मृत्यू

श्रीशैलम, २१ ऑगस्ट २०२०: तेलंगणाच्या श्रीशैलम जलविद्युत संयंत्रात आग लागली होती. यामध्ये नऊ जण आत मध्ये अडकले होते तर इतरांना बाहेर काढण्यात आले होते. परंतु, नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार अडकलेल्या या नऊ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झालाय. आज दुपारपर्यंत सहा जणांचे मृतदेह सापडले होते. त्यातील दोन मृतदेह हे सहाय्यक अभियंत्यांचे आहेत. थोड्यावेळाने उर्वरित तीन मृतदेह देखील बाहेर काढण्यात आले. त्यामुळे आता अडकलेले सर्व नऊ जण मृत झाले आहेत.

सुंदर नाईक, मोहन कुमार आणि फातिमा अशी ओळख पटलेल्या तीन मृतांची नावं आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, बचाव मोहीम अजूनही सुरू आहे. लेफ्ट बँक पॉवर स्टेशनमध्ये तीन कर्मचारी अडकलेले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

काय आहे घटना?

तेलंगणा व आंध्र प्रदेशच्या सीमा भागात असलेल्या श्रीशैलम जलविद्युत प्रकल्प आहे. या प्रकल्पातील पॉवर हाऊसमध्ये गुरूवारी मध्यरात्री अचानक आग लागली. यावेळी तिथे १९ कर्मचारी होते. मात्र, ९ कर्मचारी आगीमुळे अडकून पडले. या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आलं. बचाव मोहीम हाती घेण्यात आली. मात्र, शुक्रवारी दुपारी आधी सहा तर थोड्या वेळानं आणखी तीन जणांचे मृतदेह जवानांना मिळाले. ९ जणांचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा