बिबवेवाडीत ९० ऑक्सिजन आणि १० व्हेंटिलेटर बेड्स नव्याने उपलब्ध !

पुणे, १३ एप्रिल २०२१: पुण्यातील बिबवेवाडी येथे असणाऱ्या इएसआयसी अर्थात एम्प्लॉइज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन रुग्णालय पुणे महापालिकेच्या वतीने कार्यान्वित केले आहे. या हॉस्पिटलमध्ये १०० बेड्स उपलब्ध केल्या आहेत. यात ९० ऑक्सिजन बेड्स आणि १० व्हेंटिलेटर बेड्सचा समावेश आहे. काल या रुग्णालयाच्या अंतिम तयारीचा आढावा घेतला. यावेळी आमदार माधुरीताई मिसाळ आणि आयुक्त विक्रम कुमार हेही उपस्थित होते.

या रुग्णालयात आधीपासूनच उपलब्ध सुविधेबरोबरच आवश्यक सुविधांची पूर्तता पुणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. यात विविध कामे करण्यात आली तर आहेच शिवाय डॉक्टरही उपलब्ध करुन देत आहोत. तसेच या ठिकाणी २० एमबीबीएस डॉक्टर्स उपलब्ध झाले आहेत.

केंद्रावर पुणे महापालिकेच्या वतीने एका नोडल अधिकाऱ्याचीही नेमणूक करण्यात आली आहे. महापालिकेची स्वतंत्र यंत्रणा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे सुसज्ज आणि अत्यंत उत्तम पद्धतीचं एक तयार हॉस्पिटल सेवेत उपलब्ध झाले आहे. यावेळी मुरलीधर मोहोळ हेही उपस्थित होते. त्यांनी ट्विटरवर सांगितले की, ‘वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता पुणे शहरात विविध माध्यमातून नव्याने बेड्स उपलब्ध करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. याला काही प्रमाणात यशही येत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे हे हॉस्पिटल !’

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा