नवी दिल्ली, दि. १५ जुलै २०२०: अखेर प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावीचा निकाल जाहीर केला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी परीक्षेमध्ये उपस्थिती लावली होती त्यांचा निकाल अधिकृत cbse.nic.in आणि cbseresults.nic.in या संकेतस्थळावर जाऊन त्यांचे गुण तपासू शकतात. यासह, हे डिजीटलॉकर आणि उमंग अॅपवर देखील उपलब्ध होतील. यावर्षी ९१.४६% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ज्यामध्ये ९३.३१% मुली आणि ९०.१४% मुले उत्तीर्ण झाली आहेत. जर आपण प्रदेशनिहाय निकालाबद्दल विचार केला तर १२ वी प्रमाणे दहावीच्या निकालातही त्रिवेंद्रम उत्तीर्णतेच्या टक्केवारीत प्रथम आहे.
टक्केवारी मध्ये ०.३६% वाढ
सन २०१९ च्या तुलनेत यावर्षी उत्तीर्णतेच्या टक्केवारीत थोडीशी वाढ झाली आहे. यावर्षी उत्तीर्णतेच्या टक्केवारीत ०.३६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सन २०१९ मध्ये १,७६,१०७८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, एकूण विद्यार्थ्यांपैकी ९१.१० टक्के उत्तीर्ण झाले. त्याच वेळी, यावर्षी १८,७३,०१५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ९१.४६ टक्के उत्तीर्ण झाले आहेत.
यावर्षी उर्वरित परीक्षा कोरोना विषाणूमुळे रद्द झाली आहे. अशा परिस्थितीत पर्यायी मूल्यांकन प्रणालीचा निकाल जाहीर झाला आहे. अंतर्गत मूल्यांकन निकषांवर विद्यार्थ्यांना गुण दिले गेले आहेत.
डिजी लॉकर अॅप:
भारत सरकारने डिजिटल शैक्षणिक कागदपत्रांसाठी डिजीलॉकर अॅप नावाचे एक नवीन डिजिटल अॅप आणले आहे. निकाल जाहीर होताच सीबीएसई त्वरित दहावीची मार्कशीट, माइग्रेशन प्रमाणपत्र आणि पास प्रमाणपत्र या अॅपवर अपलोड करेल. विद्यार्थी येथून त्यांचे निकाल देखील पाहू शकतात. यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइट digilocker.gov.in वर जाऊन नोंदणी करावी लागेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी