कोल्हापूर ,२९ नोव्हेंबर २०२२ :वीज यंत्रणेतील गळती रोखणे, यंत्रणा सक्षम करणे आणि ग्राहकांना उत्तम व दर्जेदार वीजपुरवठा करणे, यासाठी कोल्हापूर जिल्ह्यास केंद्र व राज्य सरकारच्या योजनेतून ९२ कोटी रुपायांचा निधी उपलध्ब झाला आहे. तसेच यंत्रणा सक्षमीकरणासाठी निविदाही काढण्यात आली आहे.
कोल्हापूर हे शहर संपूर्ण राज्यात सर्वांत कमी वीज गळती असलेल्या जिल्हा असून, या यंत्रणेमुळे गळती आणखी कमी होण्यास मदत होणार आहे. महावितरण कंपनीने पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर दिला आहे. यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांतून निधी उपलब्ध केला जात आहे.
या निधीतून जादा क्षमतेच्या फिटरचा भार विभागून देण्यात येणार आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दुष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या एरियल बंच केबलचा वापर यासाठी केला जाणार आहे. विविध ठिकाणी कॅपॅसिटर बसविले जाणार आहे. विद्युत तारांवरील कंडक्टरचे अपग्रेडेशन केले जाणार आहे. यामुळे आता कोल्हापूरमध्ये वीज गळती रोखण्यासाठी भरपूर प्रमाणात मदत होणार आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर