निरा येथील ९५ वर्षीय आजींची कोरोनावर मात

पुरंदर, १२ ऑगस्ट २०२०: पुरंदर तालुक्यातील निरा शहरातील ९५ वर्षीय वृद्ध महिलेने कोरोनावर मात केली आहे. त्या आज आपल्या मुळगावी नीरा येथे परतल्या. आजींसह त्यांच्या कुटुंबातील सदस्य देखील कोरोनामुक्त होऊन घरी आल्याने ग्रामस्थ, आरोग्य केंद्राचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायतीचे सदस्य व स्थानिक पत्रकारांनी गुलाब पुष्प देऊन त्यांचे  स्वागत केले.

निरा प्रभाग दोन मधील बारामती रोड येथील एका मोठ्या कुटुंबातील एक ९५ वर्षीय आजी २८ जुलै रोजी कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या. त्यांना सौम्य लक्षणे होती. त्यांच्यासह कुटुंबातील तीन सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर ६ जुलैला आजींचा व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. गेली पाच दिवस हे सर्व पुणे येथे होम क्वारंटाईन राहीले.

आज बुधवार दि. १२ रोजी आजी व त्यांच्या बरोबर इतर तीघांचे निरा येथील निवासस्थानी आगमन झाले. त्यावेळी ग्रामपंचायतीचे सदस्य अनिल चव्हाण, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्र्विनी घाटगे, आरोग्य सहाय्यक गणेश जाधव, शिवाजी चव्हाण, बाप्पू भंडलकर,माजी सरपंच राजेश काकडे , चंद्रकांत धायगुडे माजी उपसरपंच बाळासाहेब भोसले, नीरा विकास आघाडीचे नाना जोशी हरिभाऊ जेधे पत्रकार भरत निगडे, राहुल शिंदे, आदिंनी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा