राज्यात ९,८१२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद, १५६ रुग्णांचा मृत्यू

मुंबई, २७ जून २०२१: राज्यात कोरोना चा प्रादुर्भाव अलीकडच्या काळात कमी होताना दिसला. मात्र, कमी करण्यात आलेल्या नियमांमुळं आणि अनलॉक प्रक्रियेमुळं संसर्गाचा धोका पुन्हा बळावण्याची शक्यता आहे. त्यात डेल्टा प्लस व्हेरीएंट मूळं राज्याच्या चिंतेत आणखीन भर पडलीय. त्यामुळं निर्बंध शिथिल करताना जिल्हाधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी अशा सूचना देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. डेल्टा प्लस चे राज्यात सर्वाधिक रूग्ण आहेत. त्याचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने उपाय योजना सुरु केल्या आहेत. दरम्यान, राज्यात कोरोनाच्या रोजच्या आकडेवारीमध्ये सातत्याने चढ-उतार दिसून येत आहेत. राज्यात काल (शनिवार) १७९ रुग्णांचा मृत्यू झालाय.

राज्यात काल दिवसभरात ८ हजार ७५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळं आजपर्यंत महाराष्ट्रात बरे झालेल्या रुग्णांचा आकडा ५७ लाख ८१ हजार ५५१ इतका झालाय. या पार्श्वभूमीवर राज्याचा रिकव्हरी रेट अर्थात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येपैकी ९५.९३ टक्के इतके झालेय. ही आरोग्य यंत्रणांसाठी आणि राज्य सरकारसाठी देखील दिलासादायक बाब ठरलीय.

काल राज्यात ९,८१२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झालीय तर ८,७५२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. त्यामुळं बरे होणाऱ्यांची संख्या आता ५७,८१,५५१ झालीय. तसेच राज्यात काल १७९ रुग्णांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.० टक्के आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा