बारामती, २९ जानेवारी २०२१: बारामती तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसह ९९ ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदाच्या आरक्षणाची आज शुक्रवार (दि.२९) नव्याने सोडत झाली. यामध्ये औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये झालेल्या याचिकेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे अनुसूचित जाती व जमातीच्या प्रवर्गासाठी यापूर्वी आठ डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या सोडतीतील आरक्षण कायम ठेवण्यात आले. ते वगळून इतर मागास प्रवर्ग व खुल्या गटातील आरक्षणाची आज नव्याने सोडत झाली. अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्का बसला असुन अनेक ठिकाणी नवीन तरुणांना संधी मिळाली आहे.
बारामती तालुक्यातील ग्रामपंचायतनिहाय सरपंचपदाचे आरक्षण गावनिहाय जाहीर करण्यात आले
सर्वसाधारण गट – जोगवडी, लाटे, होळ, मेडद, मेखळी, जळगाव कडेपठार, सुपा, वाघळवाडी, माळेगाव खुर्द, पाहुणेवाडी, बऱ्हाणपूर, झारगडवाडी, सांगवी, मानाप्पावस्ती, शिरष्णे, ढाकाळे, चांदगुडेवाडी, सायंबाचीवाडी, मासाळवाडी, तरडोली, वढाणे, चौधराडी, मोढवे, खंडोबाचीवाडी, घाडगेवाडी, दंडवाडी, जराडवाडी.
सर्वसाधारण प्रवर्ग महिला – लोणी भापकर, सोरटेवाडी, कुतवळवाडी, सोनगाव, माळवाडी (लाटे), पवईमाळ, अंजनगाव, शिर्सूफळ, चोपडज, खांडज, देऊळगाव रसाळ, कुरणेवाडी, करंजेपूल, वाणेवाडी, सोनकसवाडी, मोराळवाडी, मोरगाव, भोंडवेवाडी, सदोबाचीवाडी, पळशी, माळवाडी (लोणी), गाडीखेल, आंबी खुर्द, मगरवाडी, पानसरेवाडी, माळेगाव बुद्रूक, उंडवडी कडेपठार
इतर मागास प्रवर्ग – सस्तेवाडी, खराडेवाडी, बाबुर्डी, मुरुम, वंजारवाडी, नारोळी, धुमाळवाडी, जैनकवाडी, वाकी, मुरुम, वडगाव निंबाळकर, कांबळेश्वर, सोनवडी सुपे
इतर मागास प्रवर्ग महिला – थोपटेवाडी, डोर्लेवाडी, ढेकळवाडी, साबळेवाडी, गडदरवाडी, पिंपळी, सावळ, पारवडी, कारखेल,
काऱहाटी, मुर्टी, उंडवडी सुपे, जळगाव सुपे, काळखैरेवाडी अनुसूचित जाती प्रवर्ग – मुढाळे, करंजे, कटफळ, निंबोडी, शिरवली, पणदरे, मळद
अनुसुचित जाती महिला – काटेवाडी, कन्हेरी, भिलारवाडी, निरावागज, कोऱ्हाळे खुर्द, गुणवडी, कोळोली, गोजूबावी
अनुसुचित जमाती महिला – निंबुत
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव