आता एसएमएस पाठवून करा आधारकार्ड लॉक-अनलॉक

आधार नंबरशी संबंधित डेटाची प्रायव्हसी आणि सिक्योरिटी लक्षात घेऊन यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) एक नवं फीचर इंट्रोड्यूस केलं आहे. या फीचरच्या मदतीने युजर्स सहजपणे आपला आधार नंबर लॉक किंवा अनलॉक करू शकणार आहेत. 
 
   याचबरोबर आधार कार्डद्वारे होणारे फसवणुकीचे प्रकार देखील थांबतील. हे फिचर एखाद्या लॉकप्रमाणे काम करेल, इतर बाहेरील व्यक्ती ते अनलॉक करू शकणार नाहीत. याचबरोबर हॅकर्स लोकांच्या परवानगीशिवाय आधार व्हेरिफिकेशन करू शकणार नाहीत. या फिचरचा वापर करण्यासाठी कार्डधारकांना आपल्या रजिस्टर नंबरवरून आधार नंबर लॉक करण्यासाठी एसएमएस पाठवावा लागेल.
 
   असे करा लॉक : 
आधार नंबर लॉक करण्यासाठी कार्ड धारकांना 1947 या नंबरवर GETOTP लिहून पाठवावे लागेल. त्यानंतर मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. त्यानंतर कार्ड धारकाला LOCKUID आणि आधार नंबर लिहून 1947 वर पाठवावा लागेल. त्यानंतर आधार लॉक होईल.
 
  असे करा अनलॉक : 
आधार नंबर अनलॉक करण्यासाठी कार्डधारकाला 1947 या नंबरवर GETOTP आधार नंबर असे लिहून पाठवावे लागेल. 6 आकडी ओटीपी मिळाल्यानंतर UNLOCKUID आधार नंबर आणि ओटीपी लिहून 1947 वर पाठवावा लागेल. त्यानंतर आधार कार्ड अनलॉक होईल.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा