१४ फेब्रुवारी ला संपूर्ण महाराष्ट्रात”सोलापूर गैंगवार”प्रेक्षकांच्या भेटीस

316

शाॅन प्याराडाईझ प्रस्तुत “सोलापूर गैंगवार” चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंग चा सोहळा१६ तारखेला पुण्यातील ईडन हाॅल इथे मोठ्या दिमाखात पार पडला. या वेळी चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक यांच्या हस्ते चित्रपटाचे पोस्टर व ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले. हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस सिनेमा गृहात १४ फेब्रुवारी ला येत आहे.

या प्रसंगी निर्माते सतीश पवार यांनी आपले मत व्यक्त केले आणि म्हणले की, हा चित्रपट नक्की प्रेक्षकांना आवडेल. तसेच त्यांनी सर्व कलाकारांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या. याचबरोबर अनेक कलाकारांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले.

चित्रपटाचे दिग्दर्शक प्रभू राठोड हे या वेळी हा चित्रपट कसा तयार झाला आणि त्यांना हा चित्रपट बनवताना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले हे सांगताना ते भावुक झाले; “पण तरीही चित्रपट हा प्रदर्शित होत आहे या पेक्षा मोठी गोष्ट काय असणार” असे ते म्हणाले. त्या बरोबरच त्यांनी स्पाॅट बाॅय पासून ते आतापर्यंत या प्रवासात बरोबर असलेल्या सर्वांचे आभार देखील मानले.तसेच मिडिया पार्टनर न्यूज अनकट चे अभार मानत त्यांनी प्रतिनिधींचा सत्कार केला.

या चित्रपटात प्रमुख भूमिकेत प्रमोद सरवदे, प्रणाली भालेराव, राजेंद्र जाधव, प्रशांत जाधव, विंक्रात शिंदे व मारुती कटके यांनी भूमिका साकारल्या आहेत.

…तर पाहूया चित्रपटाच्या ट्रेलर ची झलक