रयत प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांनी गिरवले स्वच्छतेचे धडे

इंदापूर (प्रतिनिधी) – दि.१७: येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व ज्युनियर कॉलेज ( विज्ञान ) या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमध्ये इंदापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अंकिता मुकूंद शहा यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व सांगून ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्यासंबंधीचे मार्गदर्शन केले तसेच नगर परिषदेकडून यावेळी डस्टबीन चे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी यावेळी कचरा होणारच नाही ही दक्षता घेऊन तसेच ओला व सुका कचरा वेगवेगळ्या डस्टबीन मध्ये देण्याचा निर्धार व्यक्त करीत स्वच्छतेच्या सामुहिक घोषणा दिल्याने हा परिसर स्वच्छतामय व आनंदीमय झाला.

अंकिता शहा म्हणाल्या की,’ इंदापूर नगरपरिषदेने स्वच्छ इंदापूर, सुंदर इंदापूर, हरित इंदापूरचा संकल्प केला असून स्वच्छ सर्वेक्षणाच्या माध्यमातून स्वच्छता जनजागृती केली आहे. शालेय विद्यार्थ्यांनी चांगल्या सवयी आत्मसात केल्या पाहिजे. ज्याप्रमाणे आपण घरोघरी ओला व सुका कचरा वेगवेगळा करून घंटागाडी मध्ये देतो तसेच हा देखील परिसर स्वच्छ रहावा यासाठी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या डस्टबीन चा वापर करावा व आपला परिसर आपल्या आरोग्यासाठी स्वच्छ ठेवावा.’

गजानन पुंडे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, प्रशालेचे मुख्याध्यापक आर. आर. पाटील, वर्षा क्षीरसागर, मोहन शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील मोहिते यांनी केले. आभार अल्ताप पठाण यांनी मानले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा